भारतीय नौदल सक्षम होणार;  १११ हेलिकॉप्टर्ससाठी २१ हजार कोटींचा निधी मंजूर

130

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – नौदलासाठी १११ बहुद्देशीय हेलिकॉप्टर्सना मंजूरी देण्यात आली असून यासाठी २१ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची तरतूद  संरक्षण मंत्रालयाने केली आहे. तर २४  हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम अन्य गरजांसाठी मंजूर केली आहे. यांपैकी ३ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम १५० स्वदेशी आर्टिलरी गन सिस्टिमसाठी देखील देण्यात येणार आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेद्वारे (डीएसी) देण्यात आलेल्या या एकूण ४६ हजार कोटी रुपयांच्या निधीमुळे नौदल सक्षम होण्यास मदत होणार आहे.

याआधी गेल्या वर्षी देखील संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी २१ हजार कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या १११ हेलिकॉप्टरच्या खरेदीला मंजूरी दिली होती. रणनिती सहकार्य मॉडेल अंतर्गत या पहिल्या व्यवहाराला सरकारने मंजूरी दिली होती. तसेच  नौदलाच्या आगाऊ युद्ध सामग्रीसाठी ९ अॅक्टिव्ह टोड ऐरे सोनार सिस्टिमच्या खरेदीसाठी ४५० कोटी रुपयांच्या प्रस्तावासाठी मंजूरी देण्यात आली  होती.

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत बऱ्याच काळापासून अडकून पडलेल्या या प्रस्तावालाही मंजूरी देण्यात आली होती. त्यानंतर यावेळी स्वदेशी आर्टिलरी गन सिस्टिमसाठी निर्णय घेण्यात आला आहे.