भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी आमदार महेश लांडगे यांची बिनविरोध निवड

292

पिंपरी, दि.१६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पिंपरी- चिंचवड शहर भाजपाची बैठक हॉटेल ग्रॅण्ड एक्सोटिका, काळभोरनगर आकुर्डी येथे आयोजिक करण्यात आली होती. या बैठकीत आमदार महेश लांडगे यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शहराध्यक्षपदासाठी लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एड. माधवी नाईक यांनी आज दि.१६ रोजी गुरूवारी जाहीर केले.

या बैठकीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर उषा  ढोरे, माजी मंत्री विनोद तावडे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, उमा खापरे, सदाशिव खाडे, सचिन पटवर्धन, अमित गोरखे, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, रवी लांडगे, शैला मोळक, महेश कुलकर्णी, मा. स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे, सारंग कामतेकर आजी – माजी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते

 

 

WhatsAppShare