भारतीय छात्र संसद कोल्हापूर जिल्हा समन्वयकपदी पिंपरी-चिंचवडमधील साहिल भाट याची निवड

92

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – भारतीय छात्र संसदेच्या कोल्हापूर जिल्हा समन्वयकपदी पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थी साहिल अंबादास भाट यांची निवड झाली आहे.

भारतीय छात्र संसद हे राजकारणात रस असणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने उपलब्ध करुन दिलेल व्यासपीठ आहे. देशभरातील ६० हजारपेक्षा अधिक विद्यार्थी, २०० नेते, ६० आमदार, ४० खासदार आणि १४ कुलगुरुंचा सहभाग असलेली ३ दिवसीय शिबीर दरवर्षी आयोजित करण्यात येते. त्यात विद्यार्थ्यांकडून जिल्हा समन्वयकपदासाठी अर्ज मागविले जातात. त्यातून साहिल भाट यांची कोल्हापूर जिल्हा समन्वयकपदी निवड झाली आहे.

साहिल हा आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये बी. ई. चे शिक्षण घेत आहे. भारतीय छात्र संसदेच्या मिळालेल्या पदाचा वापर जास्तीत जास्त अभ्यासू युवकांना राजकारणात आणण्यासाठी करणार असल्याचे त्याने सांगितले.