भारतीय कायदा प्रकाश आंबेडकरांच्या बापाची जहागीर नाही – गिरीश व्यास

192

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – भारतीय कायदा म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या बापाची जहागीर नाही, अशी बोचरी टीका भाजप नेते गिरीश व्यास यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना तुरूंगात टाकण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यावरून व्यास यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या हातात सत्ता द्या. २ दिवसांसाठी का होईना…. मी मोहन भागवत यांना तुरूंगात टाकतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून व्यास चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले.  व्यास म्हणाले, ज्यांचा वारसा मिळाला आहे आणि ज्यांच्यामुळे त्यांना थोडाफार सन्मान मिळतो आहे, अशा नेत्यांनी असे थिल्लर वक्तव्य करू नये. लोकप्रियता मिळविण्यासाठी कामे करावीत. यामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.