भारतात दहशतवादी कारवायांचा कट रचल्याप्रकरणी दोन तरुणांना हैदराबादमधून अटक

158

हैदराबाद, दि. १३ (पीसीबी) – आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या दोन तरुण दहशतवाद्यांना हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ही कारवाई केली आहे.

अब्दुल्ला बासिथ (वय २४) आणि अब्दुल कादीर (वय १९) असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने हैदराबादमधील सात ठिकाणांवर नुकताच छापा टाकला होता. आयसिसशी संबंध असल्याच्या संशयातून आठ जणांची चौकशी करण्यात आली. यात बासिथ आणि अब्दुल कादीर या दोघांचा समावेश होता. या दोघांचाही आयसिसशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.  आयसिससाठी नवीन तरुणांची भरती करणे तसेच भारतात दहशतवादी कारवायांचा कट रचल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.