केंब्रिज अॅनालिटिका डेटा लीकप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने अमेरिकन संसद अर्थात अमेरिकन काँग्रेससमोर हजेरी लावली. यावेळी ४४ सिनेटर्सनी (खासदार) झुकरबर्गला वैयक्तिकपणे प्रश्नांचा भडीमार केला.

प्रत्येक सिनेटर्सला ५-५ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. यावेळी ४४ सिनेटर्सनी आपआपला वेळ घेत, झुकरबर्गवर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी झुकरबर्ग चांगलाच घाबरलेला दिसला.

भारतात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये फेसबुककडून कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही, अशी ग्वाही झुकरबर्गने दिली. “भारतातील निवडणुकांमध्ये फेसबुकचा प्रभाव नसेल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत”, असे झुकरबर्ग म्हणाला.