भारतातला कोरोना मृत्यूदर जगात सर्वांत कमी – केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन

0
369

नवी दिल्ली, दि.१३(पीसीबी) – जगातील इतर देशांपेक्षा भारतातला करुणा मृत्युदर सर्वात कमी आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे.

जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून 42 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर जवळपास 2 लाख 90 हजार जणांचा कोरोनाने जीव घेतला आहे. शक्तीशाली अमेरिकेने कोरोनासमोर तर अक्षरश: हात टेकले आहेत. दररोज अमेरिकेमध्ये दीड ते दोन हजार मृत्यू आहे. अशातच भारतात मात्र दिलासादायक चित्र आहे. जगभरातल्यापेक्षा भारतात सगळ्यात कमी मृत्यूदर आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वात कमी म्हणजे सुमारे 3.2 टक्के एवढं आहे. काही राज्यांमध्ये तर हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे. या तुलनेत जागतिक करोना मृत्युदर 7.5 टक्के राहिलेला आहे, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली आहे.

दरम्यान देशात केवळ मृत्यूचा दर कमी आहे इतकच नव्हे तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही सातत्याने वाढत आहे. हे प्रमाण आता 31.70 टक्क्यांवर पोहचले आहे. देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 22455 इतकी आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये 1538 रुग्ण बरे झाले आहेत.