शनिवारी दि.१४ एप्रिल, २०१८ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील हजारो नागरिक पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यास येतात, तसेच असंख्य मंडळे मिरवणूका काडतात. त्यामुळे शहरातील  वाहतूक व्यवस्था सुरळीत व  सुरक्षीत चालावी यासाठी पुणे वाहतूक पोलीसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे.

वाहतूक व्यवस्थेतील बदल पुढील प्रमाणे, पिंपरी पुलावरुन शगुन चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे, ही वाहतूक पिंपरी पुलावरुन उजवीकडे वळून भाटनगरमार्गे चिंचवडकडे वळविण्यात येणार आहे. नेहरुनगर चौकाकडून पिंपरी चौकाकडे येणारी वाहतूक एच.ए. ग्राऊंड येथे बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक हि यशवंतनगर चौक व रसरंग चौकाकडे वळविण्यात येणार आहे. एच.ए.कॉर्नर पासून पिंपरी चौकाकडे येणारी वाहतूक गांधीनगर येथे बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक हि पी.सी.एम.सी बिल्डींगकडे वळविण्यात येणार आहे. महावीर चौकाकडून अहिल्यादेवी चौकाकडे येणारी वाहतूक डी. मार्ट येथे बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक हि ग्रेडसेपरेटर इन मधून वल्लभनगरकडे वळविण्यात येणार आहे, तसेच महाराष्ट्र बँक समोरील ग्रेडसेपरेटर आऊट बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक सर्व्हिस रोडने (मोरवाडी चौक) सोडता जय मल्हार हॉटेलकडे वळविण्यात येईल.

नाशिकफाटाकडून पिंपरी चौकाकडे सर्व्हिस रोडने येणारी वाहतूक पिंपरी चौकाकडे न सोडता ती ग्रेडसेपरेटर केएसबी पंप कंपनी समोरील इन मधून चिंचवडकडे पाठविण्यात येईल. अहिल्यादेवी चौकाकडून पिंपरी पुलाकडे जाणारी वाहतूक क्रोमा शोरुम व गोकुळ हॉटेल येथे बंद करण्यात येणार आहे. तसेच अहिल्यादेवी चौक ते पिंपरीपुल हा दुहेरी वाहतूकीस खुला करण्यात येणार आहे. सदर वाहतूक व्यवस्थेतील बदल हे शनिवार दि. १४ एप्रिल २०१८ रोजी सकाळी सहा ते गर्दी संपेपर्यंत तात्पुरते अंमलात राहणार आहेत. तरी वाहन धारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन होणारी गैरसोय टाळावी व पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त अशोक मोराळे यांनी केले आहे.