भामा नदीच्या बंधा-यावरी दीड लाखांचे लोखंडी साहित्य चोरीला

85

चाकण, दि. ९ (पीसीबी)-भामा नदीच्या बंधा-यावरील एक लाख 52 हजारांचे लोखंडी साहित्य चार चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 7) रात्री एक ते दोन वाजताच्या कालावधीत काळूस गावच्या हद्दीत घडली.

वसंत महादू ढोकरे (वय 51, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम एच 14 / ई एम 5335 क्रमांकाच्या टेम्पोमधून आलेल्या चार चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळूस गावच्या हद्दीत भामा नदीवर बंधारा आहे. या बंधा-यावर आरोपी टेम्पो घेऊन आले. त्यांनी बंधा-यावरील एक लाख 52 हजार रुपये किमतीचे 76 लोखंडी बर्गे टेम्पोत घालून चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.