भाड में गया कानून और भाड में गयी आचारसंहिता ; संजय राऊतांचे वादग्रस्त विधान

122

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. तापमानाचा पारा ४० अंशाच्या वर गेला असताना प्रचाराचा ज्वरही शिगेला पोहचला आहे. राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे एकूणच राजकीय वातावरण गरमागरम झाले आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय निरूपम यांनी थेट निवडणूक आयोगालाच आव्हान दिले आहे. त्यामुळे राऊत अडचणीत येण्याची शक्यता आहे.  

भाड में गया कानून और भाड में गयी आचारसंहिता, असे विधान  संजय राऊत यांनी  मुंबईमध्ये रामनवमीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले आहे. कानून आमच्यासाठी बनवण्यात आला नाही. आम्ही हवा तेव्हा बदलू, असे वादग्रस्त विधान  राऊत यांनी यावेळी  केले आहे.

राऊत पुढे म्हणाले की, सध्या लोसकभा  निवडणुकीचे वातावरण आहे. आचारसंहिता सुरू आहे. मात्र,  जे मनात आहे ते बाहेर नाही आले की श्वास कोंडल्यासारखे होते, असे सांगून मनातील बोलायला कशाला लागते आचारसंहिता, असे राऊत  म्हणाले आहेत. दरम्यान, राऊत यांच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी निवडणूक आयोग कोणती भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.