भाडेतत्वावर कॅमेरा घेऊन गेला आणि परत दिलाच नाही ,गुन्हा दाखल

92

पुनावळे, दि. २९ (पीसीबी) – भाडेतत्त्वावर नेलेल्या कॅमेऱ्याचा अपहार केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 24 जुलै रोजी सकाळी कोयतेवस्ती, पुनावळे येथे घडली.

प्रकाश कांबळे (रा. खोपोली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत रोहित विनोद कुमावत (वय 19, रा. कोयतेवस्ती, पूनावळे) यांनी याबाबत बुधवारी (दि. 28) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित यांनी त्यांचा निकॉन डी 5200 हा कॅमेरा आरोपीला 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजता भाडेतत्त्वावर दिला. त्यानंतर आरोपीने कॅमेरा फिर्यादी यांना परत आणून दिला नाही. आरोपीने फिर्यादी यांच्या पंधरा हजार रुपये किमतीच्या कॅमे-याचा अपहार केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare