भाडेकरू तरुणाचे अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे

85

चिखली, दि. १९ (पीसीबी) – तंबाखूला चुना पाहिजे म्हणून घरात आलेल्या भाडेकरू तरुणाने घर मालकाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाले केले. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 17) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास साने चौक, मोरेवस्ती येथे घडली.

अविनाश वाघमारे (वय 30, रा. साने चौक, मोरेवस्ती) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश हा फिर्यादी यांच्या घरी भाड्याने राहत होता. सोमवारी रात्री साडेदहा वाजता तो फिर्यादी यांच्या घरात तंबाखूला चुना पाहिजे असे म्हणत आला. फिर्यादी यांची 15 वर्षीय मुलगी बेडवर बसून टीव्ही बघत होती. आरोपीने बेडवर बसून मुलीला बाहेर येण्यास सांगितले. तसेच तिच्याशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर आरोपीने अल्पवयीन पीडित मुलीला उचलून घेऊन जाईल अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक डी मुंडकर तपास करीत आहेत.