भाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर…आणि क्षणांत…

110

वाकड, दि. 26 (पीसीबी): भाडेकरू महिलेच्या पतीला चौकात लटकवण्याची धमकी देत भाडेकरू कुटुंबाचे सामान घराबाहेर फेकले. भाडेकरू महिला आणि तिच्या मुलाला घरात घुसून मारहाण केली. याप्रकरणी घरमालकासह 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 25) सकाळी ज्योतिबानगर, तापकीर चौक, काळेवाडी येथे घडली.

आदिल अन्सारी (रा. काळेवाडी), शाहरुख (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), सहा पुरुष आणि सहा महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या कुटुंबासोबत आरोपी आदिल याच्या मालकीच्या घरात भाड्याने राहतात. आदिल याच्या सांगण्यावरून सर्व आरोपींनी जबरदस्तीने फिर्यादी यांच्या घरात प्रवेश केला. फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला आरोपींनी हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या ‘पतीला चौकात लटकवीन’ अशी धमकी देत घरातील सर्व सामान घराबाहेर टाकून घराला कुलूप लावले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare