भाजी खरेदी करणा-या तरुणाचा मोबाईल पळवला

67

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – बाजूला मोबाईल फोन ठेऊन भाजी खरेदी करत असलेल्या तरुणाचा मोबाईल फोन दोन चोरट्यांनी पळवून नेला. ही घटना रविवारी (दि. 5) रात्री दळवीनगर, चिंचवड येथे घडली.

नितीन तानाजी सोनवणे (वय 25, रा. दळवीनगर, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविवारी रात्री आठ वाजता दळवीनगर येथे भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते. एका भाजीच्या गाड्यावर मोबाईल बाजूला ठेऊन फिर्यादी भाजी खरेदी करत होते. त्यावेळी आकुर्डी चौकाकडून आलेल्या एका दुचाकीवरील दोन चोरट्यांनी फिर्यादी यांचा 12 हजार 990 रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला. चोरटे चाफेकर चौकाच्या दिशेने निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare