भाजीपाला विक्रेत्याने केला महिलेचा विनयभंग

26

गहुंजे, दि. २७ (पीसीबी) – भाजीपाला विक्रेत्याने भाजी घेण्याच्या निमित्ताने महिलेला बोलावून तिचा विनयभंग केला. तसेच महिलेच्या पतीला धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 25) रात्री साडेनऊच्या सुमारास गहुंजे (ता. मावळ) येथे घडली.

मंगेश बाळासाहेब बोडके (वय 30, रा. गहुंजे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि. 26) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची वडापाव हातगाडी बंद करीत असताना रिक्षातून भाजीपाला विकणारा आरोपी तेथे आला. वहिनी तुम्हाला लसून घ्यायचे आहेत का, असे आरोपी भाजीपाला विक्रेत्याने विचारले. त्यामुळे फिर्यादी लसुन घेण्यासाठी रिक्षा जवळ गेल्या. त्यावेळी भाजीपाला विक्रेत्याने महिलेसोबत गैरवर्तन केले. फिर्यादी महिलेच्या पतीने याबाबत भाजीपाला विक्रेत्याकडे विचारणा केली असता ‘तुला बघून घेतो’, अशी धमकी भाजीपाला विक्रेत्याने फिर्यादीच्या पतीला दिली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare