भाजप सेनेचे बडे नेते आमच्या संपर्कात; आघाडीतील नेत्यांचा दावा

0
671

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला लाचारी पत्करत भाजपसोबत युती करावी लागत आहे. त्यामुळे अनेक बडे नेते नाराज आहेत. युतीचे हे बडे नेते तिकिटासाठी काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

कोण कोण नेते संपर्कात आहेत हे आम्ही तुम्हाला लवकरच सांगू आणि नावही जाहीर करू, असे वडेट्टीवार म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांना आघाडीसोबत यायचच नव्हत. यामुळे त्यांनी कधीच चर्चा केली नाही. धर्मनिरपेक्ष पक्षांना मदत न करता भाजपाला मदत करण्याचा त्यांचा इरादा आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी आंबेडकरांवर केली.

तसेच काकाच्या आशीर्वादानेच पुतणे राजकारणात मोठे झाले आहेत हे अवधूत तटकरे विसरले आहेत. त्यांचा शिवसेनेत जाण्याचा निर्णय आत्मघातकी ठरेल, असा घणाघातही त्यांनी यावेळी केली.