भाजप विद्यार्थी आघाडी निगडी-चिखली मंडल चिटणीसपदी दिपक गुप्ता यांची निवड

36

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष विद्यार्थी आघाडी निगडी-चिखली मंडल चिटणीसपदी चिखली येथील दिपक गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे.

भाजयुमोचे शहराध्यक्ष व नगरसेवक रवि लांडगे आणि विद्यार्थी आघाडीचे निगडी-चिखली मंडल अध्यक्ष ऋतिक चव्हाण यांनी दिपक गुप्ता यांना निवडीचे पत्र दिले आहे.