भाजप विद्यार्थी आघाडी निगडी-चिखली मंडल कार्याध्यक्षपदी महेश ढवळे यांची निवड

61

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष विद्यार्थी आघाडी निगडी-चिखली मंडल कार्याध्यक्षपदी महेश ढवळे यांची निवड करण्यात आली आहे.

भाजयुमोचे शहराध्यक्ष व नगरसेवक रवि लांडगे आणि विद्यार्थी आघाडीचे निगडी-चिखली मंडल अध्यक्ष ऋतिक चव्हाण यांनी महेश ढवळे यांना निवडीचे पत्र दिले आहे.