भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी यांचा राष्ट्रवादी युवक कॉग्रेसमध्ये प्रवेश

125

पिंपरी, दि. ८ (पीसीबी): दररोज होणारी महागाई तसेच अच्छे दिनचा भाजपने केलेला वादा आदीतून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे भाजपला सोडचिठ्ठी देत कार्यकर्त्यांनी युवक राष्ट्रवादी मध्ये प्र‌वेश केला. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस दिपक गुप्ता सह २५ कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.०८) युवक राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष इम्रानभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली युवक राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे, महिला शहराध्यक्ष कविताताई आल्हाट,
नगसेवक नाना काटे,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

अजितभाऊ गव्हाणे म्हणाले, केंद्र सरकारने सात वर्षांत काम काय केले तर देशवासियांची दिशाभूल करण्याचे काम केले. या खोट्या सरकारला नागरिक तर कंटाळलेच आहेत. त्याचबरोबर भाजपाचे पदाधिकारीही कंटाळले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात बदल नक्कीच होणार आहे. आणि त्या बदलाची ही नांदी आहे.

इम्रानभाई शेख म्हणाले, पावलोपावली केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. विकासाच्या मुद्दयावर निवडून आलेल्या सरकारला विकास म्हणजे काय हे माहीत नाही. भाजपाची पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता आली आणि विकास थांबला. अजित दादांनी केलेल्या कामाची उद्घाटने करण्यातच यांची पाच वर्षे गेली. मात्र, आता बदल होणार आणि परत ख-या विकासाला सुरूवात होणार आहे.

यावेळी माजी उपमहापौर मोहम्मद पानसरे, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या शमीम पठाण, ज्योतीताई गोफणे, युवक कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे, कामगार नेते युवराज भाऊ पवार, पिंपरी विधानसभा अध्यक्ष आयुष निंबारकर, शुभम कांबळे, सागर गायकवाड, अनिकेत शिरसाट, सतेज परब,मयूर खरात आणि कार्यकर्ते उपस्थित होते