भाजप ‘या’ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार ?  

141

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – लोकसभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.  त्यानंतर आता भाजपही लोकसभा उमेदवारांची पहिली यादी शनिवारी  ( दि.१६) जाहीर करणार आहे. तत्पूर्वी सोलापूर, दिंडोरी, गडचिरोली-चिमूर, माढा, नांदेड आणि  अहमदनगर दक्षिण या जागावर भाजप उमेदवार बदलणार आहे, असे सांगितले जात आहे. 

भाजप १७ ते १८ उमेदवारांची  नावे पहिल्या यादीत जाहीर करणार आहे. तर उर्वरित जागांवर अजूनही  चर्चा  सुरु  आहे. भाजपकडून ५ ते ६ जागांवर उमेदवार बदलणार आहे. यामध्ये सोलापूर, दिंडोरी, गडचिरोली-चिमूर, माढा, नांदेड आणि अहमदनगर दक्षिण या जागांचा समावेश आहे.

दिल्लीत संसदीय बोर्डाच्या बैठकीला उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि विजय पुराणिक हजेरी लावणार आहेत. या बैठकीनंतर उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.