भाजप प्रवेशामुळे हर्षवर्धन पाटलांच्या अडचणी वाढणार?

374

पुणे, दि. ११ (पीसीबी) –  इंदापुरातील काँग्रेसचे  दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांचा आज (बुधवार) भाजपप्रवेश होत आहे. जरी ते  भाजपमध्ये  प्रवेश करत  असले, तरी इंदापुरची जागा तर शिवसेनेकडे आहे, असे शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे. यामुळे आणखी तिढा वाढण्याची शक्यता आहे.

इंदापुरची जागा परंपरेनुसार शिवसेनेकडे आहे. गेल्या निवडणुकीतसुद्धा ही जागा शिवसेनेने लढवली होती. हर्षवर्धन पाटील, दत्ता भरणे आणि विशाल बेंद्रे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. बेंद्रे यांनी क्रमांक तीनची मते घेतली होती. आताही ही जागा शिवसेनेकडेच कायम राहणार आहे, अशी भूमिका  शिवसेनेने घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर  इंदापुरची जागा भाजपला शिवसेनेकडून मागून घ्यावी लागेल, नाहीतर हर्षवर्धन पाटील यांना शिवसेनेत प्रवेश करावा लागेल, अशी  चर्चा आता  सुरू झाली आहे. दरम्यान, आता पाटील यांचा भाजप प्रवेश झाल्यास  इंदापुरच्या जागेबाबत भाजप आणि शिवसेना काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे  ठरणार आहे.