भाजप आमदार शिवेंद्रराजे आणि अजित पवारांच्या भेटीचं गूढ काय ?

33

पुणे,दि.१६(पीसीबी) – पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात सातारचे भाजप आमदार शिवेंद्रराजे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेट झाली. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाली. शिवेंद्रराजे अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्यानं राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

गेल्या तासाभरापासून शिवेंद्रसिंहराजे आणि अजित पवारांमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीत विविध राजकीय विषयांवर चर्चा सुरु असल्याचं बोललं जात आहे. मात्र ही भेट नेमकी कशासाठी आहे, याचं नेमकं कारणं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचं शिवेंद्रराजे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. ते आज विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांची भेट घेणार आहेत. तर दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोनाच्या स्थितीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

WhatsAppShare