भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बनावट फेसबुक अकाऊंट वरून केली जातेय पैशांची मागणी; खुद्द आमदार जगतापांनी दिली माहिती

366

पिंपरी, दि.१८ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरातील भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाने ‘Laxmanjagtap Mla’ या नावाने अज्ञात व्यक्तीने एक बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून या अकाऊंटवरून वैयक्तिक मेसेज पाठवुन पैशाची मागणी किंवा इतर वस्तुंची मागणी केली जात असल्याची माहिती खुद्द आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली असून त्यांनी असे आवाहन केले आहे कि, फेसबुक अकाऊंटवरून अशा वादग्रस्त पोस्ट किंवा पैशांची मागणीच्या अशा पोस्टला कोणीही प्रतिसाद देवु देऊ नये’.