भाजप आमदार राम कदम यांचे प्रवक्ते पद जाणार ?

153

मुंबई, दि. ६ (पीसीबी) –  महिलांविषयी वादग्रस्त विधान करणारे भाजप आमदार राम कदम यांचे प्रवक्ते पद काढून घेण्याची शक्यता वर्तवली आहे. प्रवक्ता म्हणून कोणत्याही वाहिनीवर न जाण्याच्या सूचना राम कदम यांना भाजपने दिल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

पक्षाची थेट बदनामी होत असल्यामुळे राम कदम यांचे प्रवक्तेपद काढले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या केवळ राम कदम यांना पक्षाकडून तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. राम कदम यांच्या वक्तव्याला ७२ तास झाल्यानंतर भाजपने केवळ कारवाईचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, राम कदम यांच्या निलंबनाचा अशासकीय प्रस्ताव सभागृहात आणावा लागणार आहे. हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी मान्य केला. तर तो सभागृहात बहुमताने सिद्ध करावा लागणार आहे. तसेच  विधानसभेतील सध्याचे संख्याबळ बघता विरोधकांना सत्ताधारी शिवसेनेचा साथ मिळाली, तर राम कदम यांच्यावर कारवाई होऊ शकते.