भाजप आमदार राम कदम यांचे प्रवक्ते पद जाणार ?

95

मुंबई, दि. ६ (पीसीबी) –  महिलांविषयी वादग्रस्त विधान करणारे भाजप आमदार राम कदम यांचे प्रवक्ते पद काढून घेण्यात येण्याची शक्यता वर्तवली आहे. प्रवक्ता म्हणून कोणत्याही वाहिनीवर न जाण्याच्या सूचना राम कदम यांना भाजपने दिल्याची माहिती सूत्रांकडून समजते.