भाजप आमदार जयकुमार गोरे शरद पवारांच्या भेटीला; चर्चेला उधाण

242

पुणे,दि.१६(पीसीबी) –  माण-खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातल्या मोदी बाग निवासस्थानी  भेट घेतली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलंय.

सत्तास्थापनेसाठी सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. पुढच्या काही दिवसातच सत्तास्थापन करण्याचे संकेत दिले जात आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षांतर करून भाजपत गेलेले नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता.

जयकुमार गोरे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांचे बंधू शेखर गोरे यांच्याविरोधात माण-खटावमधून निवडणूक लढवली. त्यामध्ये जयकुमार गोरे विजयी झाले.

दरम्यान, जयकुमार गोरेंनी शरद पवारांची भेट का घेतली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र राज्यातल्या वाढत्या हालचाली पाहता या भेटीला विशेष महत्व आहे.

WhatsAppShare