भाजप आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट; तर्कवितर्कांना उधाण

243

मुंबई, दि. १३ (पीसीबी) –  भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात  तर्कवितर्कांना  उधाण आले आहे. मात्र, या भेटीचा तपशील समजू शकलेला नाही.

प्रसाद लाड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहेत. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांना भाजपमध्ये आणण्यात प्रसाद लाड यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.  यामुळे लाड यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

दरम्यान, राज ठाकरे  यांनी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल  केला होता. ईव्हीएम विरोधात त्यांनी भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचे भाजपच पहिले लक्ष्य असणार आहे.

या भेटीबाबत लाड म्हणाले की, ही भेट राजकीय नव्हती. माझे आणि राज ठाकरे यांचे पूर्वीपासून चांगले संबंध आहेत. वरचेवर आमच्या गाठीभेटी होत असतात, असा खुलासा लाड यांनी  केला आहे.