भाजपा प्रदेश प्रवक्तेपदी एकनाथ पवार यांची नियुक्ती

75

– पिंपरी चिंचवड शहर भाजपा वर्तुळात जोरदार स्वागत

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथ पवार यांची नुकतीच प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा. महापालिका निवडणुकिच्या पार्श्वभूमिवर पवार यांची नियुक्ती केल्याने भाजपा वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे.

प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख शंकर जगताप, माजी सत्तारुढ नेते नामदेव ढाके,भाजपा पिंपरी चिंचवड प्रवक्ते अमोल थोरात, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पवार यांचे अभिनंदन केले.

महापालिकेत २०१७ ते २२ दरम्यान भाजपाची सत्ता असताना एकनाथ पवार यांनी अत्यंत प्रभावीपणे भाजपाची भूमिका मांडली. टाटा मोटर्स कंपनीत संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. भोसरी विधानसभा निवडणुकिसाठी भाजपा उमेदवार म्हणून त्यांनी लक्षवेधी मते घेतली होती. फर्डे वक्ते म्हणूनही ते ओळखले जातात. आगामी विधानसभा निवडणुकिसाठी नांदेड जिल्ह्यातून ते भाजपाची उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.