भाजपाच्या भ्रष्टाचार व चुकीच्या धोरणांना कंटाळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अपक्ष गटनेते नगरसेवक कैलास बारणे यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात जाहिर प्रवेश

253

मुंबई दि.१६ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपशी संलग्न अपक्ष आघाडीचे गटनेते श्री.कैलास उर्फ बाबा बारणे यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस मध्ये प्रवेश केला. दरम्यान यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यंमत्री श्री.अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष कार्यालय मुंबई येथे हा कार्यक्रम पार पडला. संलग्न असलेल्या आघाडीचा गटनेता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातो. दरम्यान यावेळी, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) चे शहराध्यक्ष श्री.संजोग वाघेरे (पाटील), श्री.संतोष नागुभाऊ बारणे (मा.विरोधी पक्षनेते,पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा), श्री. अभयशेठ मांढरे ( अध्यक्ष : अजित प्रतिष्ठाण ),श्री.सतीशदादा दरेकर ( मा.नगरसेवक), श्री.ऋषिकेश रेवणनाथ काशिद (अध्यक्ष : कुंभार समाजोन्नती मंडळ,पिं.चिं.शहर जिल्हा, श्री.योगेश साळुंखे ,श्री.प्रविण बारणे,*श्री.शहाजी लोखंडे, श्री.अक्षय बारणे, आणि श्री.तुषार मोरे उपस्थित होते. त्यासह बारणे यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

दरम्यान भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका माया बारणे यांचे पती संतोष बारणे यांनी त्याचप्रमाणे महिला आणि बालकल्याण समिती सभापती चंदा लोखंडे यांचे पती माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने पिंपरी चिंचवड शहरात भाजपला गळती सुरु झाल्याचं बोललं जात आहे. त्याचप्रमाणे शहरातील अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या शहराच्या राजकारणात सुरु आहेत. आगामी काळात 22 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याने भाजपा मध्ये खळबळ आहे.

WhatsAppShare