भाजपाच्या अहंकाराचा दिल्लीत पराभव – अनिल परब

89

मुंबई, दि.११ (पीसीबी) – दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ५० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत, ‘आपने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर शाब्दिक निशाणा साधला.

परब म्हणाले, ‘दिल्लीकरांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आणि पर्यायाने भाजपाला नाकारले. हा पराभव म्हणजे भाजपाच्या अहंकाराचा पराभव आहे. भाजपाच्या हातातून आता अनेक प्रदेश निसटले आहेत, शिवसेनेमुळे देशातील राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे, असे ते म्हणाले.