भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा

129

नवी दिल्ली,दि.२०(पीसीबी) – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

जे. पी. नड्डा यांच नाव आधीपासूनच जवळपास निश्चित झालं होतं. त्यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली होती. पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा असलेल्या अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.

मात्र, अमित शाह यांच्या मदतीसाठी कार्यकारी अध्यक्ष म्हणून जे.पी. नड्डा यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे ही निवड लांबणीवर पडली होती.

WhatsAppShare