भाजपाचे खरे नाही, सातव्या आमदाराचा राजीनामा

66

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाला गळती लागल्याचं पहायला मिळत आहे. दररोज आमदार आणि नेते सोडून जात असल्यानं चित्र भाजपममध्ये आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे एकच खळबळ पहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय वर्तुळात बरीच खलबतं पहायला मिळत आहे. भाजपला गळती लागली असून अनेकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. अशातच उत्तर प्रदेशमधील आमदार डॉ. मुकेश वर्मा यांनी भाजपला राम राम ठोकला आहे.

भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या आमदारांची संख्या 7 वर पोहोचली असून भाजपला रोज एक धक्का भेटत आहे. त्यामुळे सगळीकडे सध्या एकच खळबळ पहायला मिळत आहे.

दरम्यान, मागील पाच वर्षात दलित, मागास वर्गातील नेत्यांना भाजपमध्ये योग्य स्थान दिलं गेलं नाही. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्य़ोजक आणि व्यापाऱ्यांचीही घोर उपेक्षा झाली. त्यामुळे कुटनीतीचे धोरण अवलंबल्यामुळे राजीनामा देत असल्याचे वर्मा यांनी सांगितलं.