भाजपवर कोणत्याही एका समाजाचा शिक्का लागलेला नाही – अमित शहा

82

जयपूर, दि. १६ (पीसीबी) – भाजप कोणत्याही एका जाती किंवा एका समाजाचा पक्ष नाही.  तो संपूर्ण समाजाचा पक्ष आहे.  आमच्या पक्षावर कोणत्याही एका समाजाचा शिक्का लागलेला नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.  

राजस्थानमधील पाली येथे मागासवर्गीय संमेलनाचे आज (रविवार) आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी शहा म्हणाले की,  आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात विकासाचा मंत्र ‘सबका साथ सबका विकास’ सांगितला आहे. विकासात सर्वांची भागीदारी असली पाहिजे. माळी, गुर्जर, जाट आणि इतर जाती, दलित आणि आदिवासी या सर्व लोकांचा भाजप हा पक्ष आहे.

२०१४ च्या निवडणुकीनंतर राजस्थानच्या जनतेने पंतप्रधान मोदींना आशीर्वाद दिला आणि सर्व मतदारसंघात विजय मिळवून देऊन त्यांना पंतप्रधान बनवले. तेव्हापासून मोदींनी मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. मागासवर्गीय आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.