भाजपला पाहून जुने दिवस आठवले, आमचेही घसे असेच कोरडे पडायचे – अजित पवार

111

मुंबई,दि.२५(पीसीबी) – भाजपला पायरीवर बसून आंदोलन करताना बघून आम्हाला आमचे जुने दिवस आठवले. घोषणा देत असताना आमचेही घसे असेच कोरडे पडायचे. मग कुणी गोळी दे कुणी काय कर असं व्हायचं, अशी आठवण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली.

भाजपला आंदोलन करताना पाहून आमचे जुने दिवस आठवले, आमचेही घसे असेच कोरडे पडायचे, अशी मिश्किल प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

यावेळी अजित पवारांनी, भाजपने आंदोलन करण्याचं काहीही कारण नाही. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती सुरू झाली आहे. भाजपने घाई करू नये. आता सरकार येऊन दोन महिनेच झाले आहेत. आम्ही असं काम करू की त्यांना आंदोलन करण्याची गरजच राहणार नाही, असं सांगितलंय.