भाजपला पराभव दिसू लागल्याने एकत्रित निवडणुकांचा घाट – राज ठाकरे

85

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – आगामी निवडणुकांमध्ये पराभव दिसू लागल्यामुळे लोकसभेसह ११ राज्यांच्या निवडणुका एकत्रित घेण्याचे खूळ भाजपच्या सरकारच्या डोक्यात आले आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. भाजप आता निवडून येणार नाही याची पंतप्रधान मोदींना भीती वाटत आहे, त्यामुळेच एकत्र निवडणुकांचा घाट घातला जात आहे, असाही आरोप राज ठाकरे यांनी केला.