भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु – संजय राऊत

272

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु झाली आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सध्या राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, या परिस्थितीला तोंड देण्यात राज्य सरकारला पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असे राऊत म्हणाले.

राज्यातील नेतृत्व बदलाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपध्यक्ष अमित शहा घेतील. परंतु मोदी सध्या परदेशात आहे. राजकीय पडद्यावरुन सरकार गायब होणे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने बघ्याची आणि पळपुटी भूमिका घेऊ नये, असेही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर आज (बुधवार) मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे.