भाजपने प्रभू रामचंद्रांचा अपमान केला- उद्धव ठाकरे

52

मुंबई, दि. १० (पीसीबी) – देशातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच बलात्काराच्या घटना आणि त्याबाबबत भाजप नेत्यांची बेताल वक्तव्ये, दिलेली आश्वासने न पाळणे यावरून शिवसेनेने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली आहे. पंतप्रधान मोदी हे अच्छे दिन आणतील असे आश्वासन दिले होते. पण महागाईपासून काळ्या पैशांपर्यंत एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. लोकांना थापा मारून पुन्हा-पुन्हा राज्य आणायचे याच नीतीला ‘चाणक्य’निती म्हणायचे असेल तर कसे व्हायचे, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजप, पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात बलात्कार, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे याकडे लक्ष वेधत ‘बलात्कार ही विकृतीच आहे, पण म्हणून सर्व रामभरोसे सोडायचे? मग राज्यकर्ते म्हणून मिरवायचे कशाला? हा रामप्रभूंचा अपमान आहे,’ असे शिवसेनेने म्हटले आहे.