भाजपच्या संघटन सदस्यता अभियान व रक्षाबंधन पर्वास रहाटणीत उत्स्फूर्त प्रतिसाद

173

चिंचवड, दि. 10 (पीसीबी) – आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहाटणीत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सविता खुळे यांच्या कार्यालयात क्रांतिदिनाचे औचित्य साधून संघटन पर्वास सुरवात करण्यात आली. त्यामाध्यमातून सुरू असलेल्या नवीन सदस्य नोंदणीस रहाटणीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

देशात भारतीय जनता पक्ष अधिक बळकट करण्यासाठी देशातील प्रत्येक घराघरात भाजपचा सदस्य तयार करणे या उद्देशाने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी 6 संघटन सदस्यता अभियानाची सुरवात केली आहे. 6 जुलै रोजी सुरू झालेल्या या अभियानाचा समारोप 11 ऑगस्ट रोजी होणार आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहाटणी प्रभाग क्रमांक 27 मध्ये नगरसेविका सविता खुळे यांनी शुक्रवारी हे अभियान आपल्या जनसंपर्क कार्यालयात राबविले. या अभियानात सुमारे 650 नवीन सदस्यांची नोंदणी करण्यात आली. त्याचबरोबर यावेळी शक्ती सम्मान महोत्सव ‘रक्षाबंधन पर्व’ उपक्रमांतर्गत रहाटणीतील महिला बचत गटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुमारे 450 राख्यांसोबतच अभिप्राय कार्डही लिहून पाठविण्यात आले.