भाजपच्या वतीने आणीबाणी काळातील सत्याग्रहींचा मंगळवारी सत्कार होणार

72

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि. २६) आणीबाणी एक पर्व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आणीबाणीच्या काळातील सत्याग्रहींचा सत्कार करण्यात येणार आहे.

चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिरासमोरील मोरया प्रसाद हॉलमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होईल. आणीबाणीविरूद्धच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस उमा खापरे आदी उपस्थित असतील.