भाजपचे १६ बलाढ्य नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर?; अजित पवारांनी…

244

पुणे, दि.१८ (पीसीबी) : आगामी महापालिका निवडणुकीचे वारे आत्तापासूनच वाहायला सुरुवात झाली आहे. पालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपाचे प्रभाग निवडून आणतील अशा क्षमतेचे 16 नगरसेवक प्रवेश करणार आहेत. ‘पुण्यात सत्ता काबीज करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यूहरचनेला सुरुवात केली आहे’, असं एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.

तरी राष्ट्रवादीने भाजप नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाची तयारी जोरात सुरु केली आहे. सूत्रांकडून असंही समजतंय कि, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या गुप्त बैठकाही झाल्या असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्याचे या नेत्याने पुढे बोलताना सांगितले. पक्षाची बलाबल गरज लक्षात घेऊन संबंधित नगरसेवकांना प्रवेश दिला जाईल. अशी माहिती सध्याला समोर येतेय.

WhatsAppShare