भाजपचे लोक माझा दाभोलकर करतील, पण मी माघार घेणार नाही – उर्मिला मातोंडकर

102

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – भाजपचे लोक माझा दाभोलकर करतील, पण मी मराठी मुलगी आहे. एकदा मैदानात उतरली आहे, आता माघार घेणार नाही, अशा शब्दांत उत्तर मुंबई मतदारसंघातील  काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी भाजपला इशारा दिला आहे.  

बोरिवली येथे आज (सोमवार)  उर्मिला मातोंडकर प्रचार करत होत्या. यावेळी त्यांच्या सभेत भाजप समर्थकांनी पंतप्रधान  मोदींच्या नावे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.  त्यानंतर  काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते  यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.  यामुळे काही काळ  वातावरण  तणावपूर्ण झाले होते.

या घटनेवर  बोलताना उर्मिला मातोंडकर  म्हणाल्या की,  या सभेसाठी व्यवस्थित परवानगी घेतली होती.    शांततेत   सभा सुरु असताना भाजपचे गुंड लोक  घुसले. त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. आमच्या लोकांनी आधी दुर्लक्ष केले. पण नंतर त्यांनी अश्लील, विभत्स हावभाव करण्यास सुरुवात केली. त्यांनी महिलांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मातोंडकर यांनी यावेळी केला.