भाजपचे खासदार सुजय विखे यांची शरद पवारांवर सडकून टीका

192

राहुरी, दि. ६ (पीसीबी) – भाजपचे खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे त्यांनी ‘आज राष्टवादीची जी वाताहत झालीय त्याचे कारण राष्ट्रवादी काँग्रेसच आहे असे म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या उमेदवारीच्या संदर्भातही सुजय विखे यांनी भाष्य केले आहे.

सुजय विखे बोलताना म्हणाले, मी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढायला तयार झालो होतो पण त्यांच्या नेत्यांनी जुना संघर्ष बाहेर काढला. विखे कुंटूब संपविण्याचा घाट घातला. पण आमच्या रक्तात राजकारण. कोण किती हवेत आहे त्यांना जमिनीवर आणन्याचे काम विखे घराण्यानेच केलय. सुजय विखेंच्या या टीकेमुळे पवार-विखे हा राजकीय वाद पुन्हा एकदा पेटला आहे.

सुजय विखे हे राहुरीतील श्री डेव्होल्पर्सचा शुभारंभ कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विषेश पोलीस सन्मानित पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ यांचा खासदार विखेंच्या हस्ते सन्मान करण्यात आला.