भाजपकडून उमेदवारीसाठी ३० लाखांचा चेक झळकवणारा कार्यकर्ता शिवसेनेत

39

सांगली, दि. ११ (पीसीबी) – भाजपकडून उमेदवारी मागताना ३० लाखांचा चेक झळकवणाऱ्या कार्यकरत्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी सचिन चौगुलेने उमेदवारी मागितली होती.
मिरजेत भाजपकडून काही दिवसांपूर्वी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या. मुलाखती दरम्यान भाजपचा सक्रिय कार्यकर्ता असलेल्या सचिन चौगुलेने मुलाखत घेणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना थेट तीस लाखांचा चेक दाखवत उमेदवारीची मागणी केली होती.
पैसे असणारा उमेदवार हीज विजयाची क्षमता अशी भाजपाची मानसिकता असेल तर माझ्याकडे ३० लाख रूपये आहेत, असे खळबळजनक विधान करत मुलाखती चालू असतानाच त्याने चेक झळकवला होता. त्यामुळे व्यासपीठावर बसलेले भाजप आमदार आणि नेत्यांची भंबेरी उडाली होती.