भाजपकडून ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाचं प्रकाशन

366

नवी दिल्ली,दि.१२(पीसीबी) – भाजपकडून ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाचं दिल्लीत प्रकाशन करण्यात आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत हे प्रकाशन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणारं हे पुस्तक दिल्ली भाजपच्या पक्ष कार्यालयात प्रकाशित झालं आहे. मात्र, या पुस्तकामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी करणं अनेकांना पटणारं नाही.

मराठा क्रांती मोर्चानेही या पुस्तकाला विरोध दर्शवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. आपण प्रधानमंत्री आहात आपला सन्मान आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना कधीही शक्य नाही या घटनेचा निषेध करतो, असं समन्वयक विनोद पाटील म्हणाले आहेत.

WhatsAppShare