भांडूपमध्ये शाळकरी मुलाची शाळेबाहेरच धारदार शस्त्राने वार करुन हत्या

305

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – एका शाळकरी मुलाची शाळेबाहेरच धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली आहे.  ही घटना भांडूपमध्ये राम कली सन्मान सिंग विद्यालयाच्या बाहेर घडली.

सुशील वर्मा (वय १७) असे हत्या झालेल्या विद्यार्थ्‍याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुशील वर्मा हा विद्यार्थी भांडूप येथील राम कली सन्मान सिंग विद्यालयाच्या शाळेच्या बाहेर उभा होता. यावेळी रुमाल बांदून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्याच्यावर धारदार शस्‍त्राने वार केले.  सुशीलच्या मित्रांनी त्याला तातडीने रूग्‍णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्‍यान त्‍याचा मृत्‍यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेत तपास सूरू केला आहे. मात्र हल्‍लेखोराने तोंडाला रूमाल बांधलेला असल्यामुळे त्याला ओळखण्यात अडचणी येत आहेत. हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. भांडूप पोलिस  तपास करत आहे.