भर उन्हात पोलवर चढुन जनतेला अखंडीत विज पुरवठा करणारे आमचे विज कर्मचाऱ्यांच्या कामाच कौतुकतर झालच पाहिजे

91

 

मावळ, दि.२६ (पीसीबी) – वीजपुरवठा ही अत्यावश्यक सेवेपैकी एक सेवा आहे.सर्वात महत्त्वाची अत्यावश्यक सेवा जीव धोक्यात घालुन देत असलेले वीज कामगार संकट काळी काळवेळ न पाहता सदैव सेवा देत असतात. मात्र आज वीज कामगारांच्या कामाची दखल घेण्यास कुणीही तयार नाही. कौतुका पासुन वंचित राहिलेल्या वीज कामगाराचे कौतुक करणे गरजेचे आहे.

आजच्या या अभुतपुर्व जनता कर्फ्यूमध्ये आणि संचारबंदीमध्ये काळात माञ तो दुर्लक्षित राहिला आहे,त्याचा कामाची ना शाषण ना जनता दखल घेतेय. अत्यावश्यक सेवेपैकी एक असलेल्या महावितरनचा लाईन स्टाप कर्मचाऱ्यांच्या दखल घेत नसल्यामुळे याला प्रोत्साहन देण्यासाठी आरोग्य पोलिस खात्याबरोबरच याचांही कामाचे कौतुक होणे गरजेचे आहे.

प्रिन्ट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाने पोलीस, आरोग्य, सफाई कामगार, टाळ्या, थाळी वाजवणारे राजकारणी सेलीब्रेटी याची दखल घेतली पण जीवाची पर्वा नकरता काम करणाऱ्या वीज कामगारांची दखल आपण घेणे गरजेचे होते. ती आजपर्यंत घेतली गेली नाही

इतरांन बरोबरच वीज कामगार या संकट काळात महत्त्वाचा आहे.जर का त्यांनी विद्युत पुरवठा अखंडीत ठेवला नसता तर त्यांची गरज आपणास कळाली असती. पण निमुटपणे जीव धोक्यात घालुन तो सेवा करीत आहे.वीज सप्लाय जर सुरळीत ठेवला नसता तर संचार बंदी काळात घरात थांबलेली मंडळी रस्त्यावर आली आसती ती कुणालाही ऐकली नसती.

टीव्ही, फॅन, ऐसी, फ्रिज या शिवाय आपण घरात राहु शकत नाही,पण भर उन्हात पोलवर चढुन जनतेला अखंडीत विज पुरवठा करणारे आमचे विज कर्मचारींचा कामाची कुणीही दखल घेतली नाही