भरसभेत अश्लिल किस्सा सांगणाऱ्या भाजप खासदार बनसोडे यांचे भाषण रोखले  

1149

सोलापूर, दि. ३० (पीसीबी) – भरसभेत व्यासपीठावर अश्लिल किस्सा सांगणाऱ्या   भाजप खासदार शरद बनसोडे  यांचे भाषण रोखण्यात आले. बनसोडे यांनी आक्षेपार्ह भाषण करून शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपला गालबोट लावल्याची प्रतिक्रिया उपस्थितांतून व्यक्त केली जात होती. तर बनसोडे यांनी अकलेचे तारे तोडून स्वत:चे हसे करून घेतले.  

खासदार बनसोडे यांच्या  जन्मगावी म्हणजे पानमंगरूळ येथे डॉ. अशोक हिप्परगी यांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व्यासपीठांवर उपस्थित होते.

यावेळी  खासदार बनसोडे यांनी सभेचे संकेत सोडून स्वानुभवाचे प्रसंग सांगताना उपस्थित महिला आणि ज्येष्ठांचा विचार न करता अश्लील किस्सा सांगून स्वतःचे हसू करून घेतले. समोर महिला पदाधिकारी बसल्या होत्या. याचे भान ही बनसोडे यांना राहिले नाही. त्यानंतर त्यांचे भाषण त्वरित रोखण्यात आले. अखेर विद्यमान कॉंग्रेस आमदारांनी माईकचा ताबा घेतला आणि बनसोडे यांचे भाषण थांबविले.