भरदिवसा 75 वर्षीय वृद्ध तलवार घेऊन फिरत होता; पोलिसांना माहिती मिळताच…….

66

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी 75 वर्षीय वृद्धाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 13) दुपारी इंदिरानगर चिंचवड येथे करण्यात आली.

सुभाष मुरलीधर करडे (वय 75, रा. इंदिरानगर, चिंचवड) असे अटक केलेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार शांताराम हांडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरात कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगण्यास मनाई आहे. असे असताना आरोपी सुभाष करडे हा तलवार सदृश हत्यार जवळ बाळगून मंगळवारी भर दिवसा दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास सार्वजनिक रस्त्याने फिरत होता. या बाबत माहिती मिळाल्यानंतर पिंपरी पोलिसांनी कारवाई करत सुभाष करडे याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare