भय्यू महाराजांच्या पार्थिवाला कन्येने दिला मुखाग्नी

0
592

इंदूर, दि. १३ (पीसीबी) – आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) अंत्यसंस्कार करण्यात आले. भय्यू महाराजांची कन्या कुहू हिने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. भमोरी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लाखो भक्तांनी साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

भय्यू महाराज यांनी मंगळवारी (दि.१२ ) इंदूरमधील राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती.अंत्यसंस्कारापूर्वी सजवलेल्या रथातून भय्यूजी महाराज यांची अंत्ययात्रा सूर्योदय आश्रमातून मुक्तीधाम स्मशानभूमीपर्यंत काढण्यात आली. आश्रम परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी हजारो भक्तगण उपस्थित होते. यावेळी राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भय्यू महाराज यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तणाव असाह्य झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. तर सावत्र आईमुळेच माझ्या वडिलांनी आत्महत्या केली, असा आरोप कुहूने केला आहे.  तर कुहूला मी आवडत नसल्याने ती असे आरोप करत आहे, असे आयुषी यांनी म्हटले आहे. पहिली पत्नी माधवी यांच्या निधनानंतर गेल्या वर्षी ४९ वर्षीय भय्यू महाराज यांनी ग्वाल्हेरमधील डॉ. आयुषी यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. तर कुहू पुण्यात शिकते.