भद्रावती नगरपरिषदेवर शिवसेनेचा सलग पाचव्यांदा भगवा

150

चंद्रपूर, दि. २० (पीसीबी) –  चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरपरिषदेवर नगराध्यक्ष पदासह पूर्ण बहुमत मिळवत शिवसेनेने पुन्हा एकदा भगवा फडकावला. गेल्या २० वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेला पुन्हा एकदा मतदारांनी कौल दिला आहे.

२७ पैकी शिवसेनेने १६ जागा मिळवत पूर्ण बहुमत प्राप्त केले. तर सत्ता मिळवण्याच्या ईर्ष्येने पूर्ण ताकतीने उतरलेल्या भाजपला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले. विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र शिवसेनेने सलग पाचव्यांदा येथे हे यश मिळवले आहे.

नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत शिवसेनेचे उमेदवार अनिल धानोरकर यांनी भाजपच्या सुनील नामोजवर यांना ३६१६ मतांनी पराभूत केले. भद्रावती नगरपरिषदेची निवडणूक ही केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर आणि शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी प्रतिष्ठेची केली होती.